मुंबई – केरळच्या कोझिकोड विमानातळाच्या धावपट्टीवरून एअर इंडियाचे विमान घसरून २ वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईतील वैमानिक दीपक साठे हे होते.
दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. १५ वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये वैमानिक होते. वर्ष १९८१ मध्ये हवाई दलात वैमानिक म्हणून ते रूजू झाले होते. दीपक साठे हे हवाईदल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर राहिले होते. त्या वेळी त्यांनी मानाची तलवारही जिंकली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना आणि अन्य परिवार आहे. अपघात झालेले विमान दुबईतून केरळला आले होते. विमान उतरवत असतांना ते धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले. या विमानात १४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.
(सौजन्य : IndiaTv)
हा अपघाच इतका भयंकर होता की, विमानाचे २ तुकडे झाले. या प्रकरणी नागरी उड्डान महानिर्देशनालयाने सखोल चौकशीचा आदेश दिला आहे.