मुसलमानांना मिळालेल्या ५ एकर भूमीवर मशीद नाही, तर संशोधन केंद्र आणि ग्रंथालय उभारणार ! – सुन्नी वक्फ बोर्डाची अधिकृत घोषणा

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांना दिलेल्या ५ एकर भूमीवर बाबर किंवा अन्य कुणाच्याही नावावर कोणतीही मशीद किंवा रुग्णालय बनवण्यात येणार नाही, तर तेथे संशोधन केंद्र आणि ग्रंथालय उभारण्यात येणार आहे, असे सुन्नी वक्फ बोर्डाने प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले आहे. यासाठी बोर्डाकडून ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ नावाचा न्यास बनवण्यात आला आहे.

बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या भूमीवर सामाजिक माध्यमांतून, तसेच अन्य माध्यमांद्वारे ‘या भूमीवर ‘बाबरी रुग्णालय’ बांधण्यात येणार आहे आणि खलील खान त्याचे संचालक असतील’, असे पसरवण्यात येत आहे. हे वृत्त खोटे आहे.