‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले अभूतपूर्व संशोधन कार्य ‘श्री गणेशचतुर्थीच्या’च्या निमित्ताने १९ ऑगस्टपासून प्रसिद्ध करत आहोत.

अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘व्यक्तीच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांवरून त्याच्या आध्यात्मिक स्थितीविषयी कळू शकते. एखाद्याचे साधना आरंभ करण्यापूर्वीचे आणि अध्यात्मात चांगली प्रगती केल्यानंतरचे अशा दोन छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्या व्यक्तीतील आध्यात्मिक स्तरावरील पालट लक्षात येतात.