१ फेब्रुवारीपासून वीजदेयक थकबाकीदारांची वीजजोडणी तोडणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

थकबाकीदारांमधील अल्प थकबाकीदारांनी वीज खात्याच्या ‘वन टाईम् सेटलमेंट’ योजनेचा लाभ घेतला आहे. नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर सर्व थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्र्यांनी दिली आहे.

दिव्यांगांनाही (विकलांगांनाही) आनंद देण्यासाठी ‘हेल्पडेस्क’

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद दिव्यांग (विकलांग) व्यक्तींनाही घेता यावा यासाठी ‘आंचिम’मध्ये दिव्यांगांसाठी खास ‘हेल्पडेस्क’ कार्यरत असेल, तसेच यंदा ‘एक्सेसिबल इंडिया-एक्सेसिबल चित्रपट’ या विभागात ३ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

अशा वेब सिरीज सरकार कधी बंद करणार ?

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’ अ‍ॅपवरून १५ जानेवारीपासून प्रसारित झालेल्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे. यात जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयातील साम्यवादी विचारसरणीचे समर्थन करण्यासह देवतांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घालण्यात आले आहेत.

इंडोनेशियातील भूकंपात ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ

इंडोनेशियामध्ये झालेल्या ६.२ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पाकने विमानाचे भाडे न दिल्याने मलेशियाकडून पाकच्या सरकारी विमान आस्थापनाचे विमान जप्त

इस्लामी देश म्हणून पाकला साहाय्य करणार्‍या मलेशियानेही पाकला वार्‍यावर सोडले आहे, हे पहाता आतातरी पाकला आतंकवाद आणि विकास यांतील भेद लक्षात येईल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे भविष्यात त्याचा विनाश अटळ आहे !

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

आतापर्यंत आपण संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे, ‘लाईव्हस्ट्रीम’ इत्यादी विषयी माहिती वाचली. आज अंतिम भाग येथे देत आहोत.

लोकशाहीच्या चारही आधारस्तंभांनीअंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !

भारतीय लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकारिता हे ४ आधारस्तंभ आहेत. अलीकडे काही घटना पाहिल्या, तर हे चारही आधारस्तंभ निखळतात कि काय ? असे वाटल्यावाचून रहात नाही.

साधनेमुळे निर्माण होणारी सात्त्विकता, निर्मळता, प्रीती इत्यादी गुणांमुळे अन्य युगांप्रमाणे कलियुगातही पशूपक्षी आकर्षित होणारे सनातनचे साधक, संत आणि आश्रम !

सत्य, त्रेता आणि द्वापर युगामध्ये ऋषीमुनींच्या आश्रमांतील दृश्य आता कलियुगामध्ये सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे.

जगातील एकमेव अद्वितीय स्थान असलेला रामनाथी, गोवा येथील चैतन्यमय सनातन आश्रम !

आश्रमात साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व असल्यामुळे चैतन्ययुक्त अशा या वैकुंठलोकास भेट देण्यास आलेले कोणीही परत जातांना गुरुकृपेने कृतकृत्य होऊन स्वतःसमवेत येथील चैतन्य आणि आनंद घेऊन जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले