इंडोनेशियातील भूकंपात ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये झालेल्या ६.२ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपामध्ये ६० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. या भूकंपाचा झटका ७ सेकंद जाणवला. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आलेला नाही; मात्र समुद्रकिनार्‍यावर सतर्क रहाण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे.