पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – १ लाख ४० सहस्र वीजदेयक थकबाकीदारांमधील अल्प थकबाकीदारांनी वीज खात्याच्या ‘वन टाईम् सेटलमेंट’ (ओ.टी.एस्.) योजनेचा लाभ घेतला आहे. नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर सर्व थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे.
वीज खात्याने १ डिसेंबर २०२० पासून वीज थकबाकीदारांसाठी ‘ओ.टी.एस्.’ योजना लागू केली आहे. या अंतर्गत उशिरा देयक भरल्याने भरावा लागणारा दंड आकारण्यात येत नाही. ही योजना आता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. वीजमंत्री काब्राल पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील सुमारे ७ लाख वीजजोडणी धारकांमधील १ लाख ४० सहस्त्र वीजजोडणीधारक वेळच्या वेळी वीजदेयक भरत नाहीत.’’