गडचिरोली येथे पोलिसांच्या गोळीबारात २ नक्षलवादी ठार 

जिल्ह्यातील ग्यारापत्ती गावातील नरकसा अरण्य परिसरात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या ५ गावांमध्ये यंदा प्रथमच साजरा झाला सार्वजनिक गणेशोत्सव !

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील मांडली, बिलावर, फिंतर, डड्डू आणि डडवारा या ५ गावांमध्ये यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ही सर्व गावे जम्मूपासून अनुमाने १०० किलोमीटर अंतरावर असून राज्याचा हा दुर्गम भाग आहे.

नागपूर येथे पाकिस्तानातील गुरुद्वारा श्री ननकाना साहिब येथून निघालेल्या नगर कीर्तनाचे जल्लोषात आगमन

श्री गुरुनानक देव यांच्या ५५० व्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने पाकिस्तानातील गुरुद्वारा श्री ननकाना साहिब येथून नगर कीर्तन निघाले होते. त्याचे १४ सप्टेंबरला येथील झिरो माईल या ठिकाणी रात्री जल्लोषात आगमन झाले.

नागपूर येथे मोहनदास गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार 

मोहनदास गांधी यांच्यावर फेसबूकच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी पुण्यातील मयूर जोशी याच्याविरुद्ध येथील सीताबर्डी पोलीस ठाण्यात ‘नोइंग गांधीझम ग्लोबल फ्रेण्ड्स ग्रुप’ने तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘ब्लॅक मनी अ‍ॅक्ट’नुसार सौ. नीता अंबानी यांच्यासह त्यांच्या ३ मुलांना आयकर विभागाची नोटीस

ब्लॅक मनी अ‍ॅक्ट २०१५’ नुसार आयकर विभागाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी सौ. नीता अंबानी आणि त्यांची ३ मुले यांना नोटीस पाठवली आहे.

महाजनादेश यात्रेसाठी पुण्यात मोठ्या प्रमाणात लावलेल्या फ्लेक्समुळे मुख्यमंत्र्यांकडून खेद 

केवळ फ्लेक्स लावून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील भाजपच्या अधिकार्‍यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पदाधिकार्‍यांनी शहरात मोठ्या प्रमाणात फलक लावले.

समान नागरी कायद्यासाठी आतापर्यंत ठोस प्रयत्न का केले गेले नाहीत ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाला सातत्याने समान नागरी कायदा करण्यासाठी सांगावे लागत आहे, हे पहाता आता केंद्र सरकारने लवकरात लवकर देशात हा कायदा लागू करावा !

पाक सैनिकांनी त्यांच्या २ सैनिकांचे मृतदेह पांढरे निशाण फडकावत नेले 

काश्मीरच्या हाजीपूर येथे नियंत्रणरेषेवर भारतीय सैन्याने पाकच्या २ सैनिकांना ठार केले. पाकने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना हे सैनिक मारले गेले. या सैनिकांचे मृतदेह नेण्यासाठी पाक सैन्याने पांढरे निशाण (शरणागती पत्करल्याचे निशाण) फडकावले आणि ते मृतदेह घेऊन गेले.

हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी बेळगावच्या ‘डायोसिस संस्थे’चे बिशप डेरेक फर्नांडिस यांचे भगवा झगा घातलेले छायाचित्र प्रसारित

ख्रिस्ती पंथामध्ये भगवा वेश परिधान करण्याची कुठलीही परंपरा नसतांना तसा वेश परिधान करून हिंदूंची फसवणूक करण्यासाठीच हा प्रयत्न करण्यात आला आहे, यात शंका नाही !

‘महामृत्युंजय मंत्राचा रुग्णांवर परिणाम होतो का ?’, यावर देहलीतील रुग्णालयाकडून संशोधन 

मंत्रोच्चाराचा परिणाम होण्यासाठी तो म्हणणार्‍यांमध्ये देवाप्रती भाव असणे आवश्यक आहे, तसेच तो साधना करणाराही हवा. देहली रुग्णालयाने ‘रुग्णांवर मंत्रोच्चाराचा काय परिणाम होतो’, याचा अभ्यास करतांना या घटकांचाही विचार करायला हवा. असे केले, तरच त्या संशोधनातून योग्य निष्कर्ष निघू शकेल !


Multi Language |Offline reading | PDF