INC Karnataka Muslim Appeasement : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व मुसलमानांना ठरवले मागासवर्गीय !

सरकारी शैक्षणिक संस्था आणि नोकर्‍या यांमध्ये दिले आरक्षण !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यातील सर्व मुसलमानांना मागासवर्गीय ठरवून त्यांना सरकारच्या नियंत्रणाखालील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकर्‍या या ठिकाणी आरक्षण देण्यात येणार आहे.

मुसलमानांना इतर मागासवर्गीयांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. कर्नाटकात मुसलमान १२.९२ टक्के आहेत. त्यांना राज्यात धार्मिक अल्पसंख्यांक मानले जाते.

(सौजन्य : India Today) 

या निर्णयावरून पंतप्रधान मोदी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला अनुसूचित जाती आणि जमाती, तसेच इतर मागासवर्गीय यांचे हक्क मुसलमानांना द्यायचे आहेत.

संपादकीय भूमिका 

  • जगातील एकाही इस्लामी देशात मुसलमानांना मागासवर्गीय ठरवून त्यांना आरक्षण दिलेले नाही; मात्र काँग्रेसने हा चमत्कार केला आहे !
  • ‘भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, या विचाराने चालणार्‍या काँग्रेसने उद्या संपूर्ण देशाचेच इस्लामीकरण केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच हिंदूंनी काँग्रेसचा राजकीयदृष्ट्या अंत करणे आवश्यक !