डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍याने भारताला लाभ होईल ! – तज्ञांचे मत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यावर १०० कोटी रुपये व्यय होणार आहेत, ते अनावश्यक आहेत, अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

ट्रम्प यांच्यासाठी बनवण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये त्यांच्या आवडत्या गोमांसाच्या पदार्थाचा समावेश नाही

केंद्र सरकारने केवळ ट्रम्प यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातच गोमांस आणि त्याच्यापासून बनवण्यात येणार्‍या पदार्थांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

कोलकाता येथे महाशिवरात्रीला शिवाची पूजा करणार्‍या मुसलमान महापौराला इस्लामी धर्मगुरूंनी घोषित केले ‘काफिर’ !

हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजून त्यांचे खच्चीकरण करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी या फतव्याविषयी आता का तोंड उघडत नाहीत ? कि ‘धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठीच आहे’, असे त्यांना सांगायचे आहे ?

(म्हणे) ‘राष्ट्रवादाचा उपयोग देशाची प्रतिमा जहाल करण्यासाठी होत आहे !’ – डॉ. मनमोहन सिंह

राष्ट्रवाद आणि ‘भारतमाता की जय’ ही घोषणा यांचा उपयोग देशाची जहाल अन् तीव्र भावना मांडणारी प्रतिमा निर्माण करण्यासाठी केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठी दरी निर्माण होत आहे, असा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला. राष्ट्रवादाचा खरा अर्थच ठाऊक नसलेले डॉ. मनमोहन सिंह यांना असेच वाटणार !

नवापूर (गुजरात) येथे दारू माफियाकडून पोलीस शिपायाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न म्हणजे पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्याचेच द्योतक होय ! अशांवर आता कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘अमूल्याने विश्‍वबंधुत्वाचा अंगीकार केला आहे !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेसचे नेते

‘हे विश्‍वची माझे घर’, अशी हिंदूंची संस्कृती आहे; मात्र शत्रूराष्ट्राचे गुणगान करावे, असा त्याचा अर्थ नाही. काँग्रेस यातून तसा अर्थ काढत आहे आणि अमूल्याचे अश्‍लाघ्य समर्थन करून ती स्वतःचे पाकप्रेम दर्शवत आहे. गेल्या ७२ वर्षांपासून काँग्रेस अशा प्रकारची कृती करून देशाचे खच्चीकरण करत आली आहे, हेच यातून पुन्हा दिसत आहे.

गोव्यात नौदलाच्या ‘मिग-२९ के’ लढाऊ विमानाचा अपघात

‘उडत्या शवपेट्या’ बनलेली मिग विमाने ! मिग विमानांचा अशा प्रकारे अपघात होत असतांना त्यांना वायूदलाच्या ताफ्यातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

प्रसिद्धीमाध्यमांनी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविषयी ‘डबल ढोलकीवाले’ काम बंद करावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

महात्मा गांधी यांनी पाकिस्तानमधील निर्वासितांना भारतात आश्रय देण्यास सांगितले होते. गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांनी जे सांगितले तेच आम्ही करत आहोत.

(म्हणे) ‘हेमंत करकरे यांची हत्या पोलीस दलातील हिंदुत्वनिष्ठांनी केली असावी !’

महाराष्ट्र पोलिसांना कोळसे पाटील यांचे हे विधान मान्य आहे का ? नसल्यास पोलिसांनी त्याविरुद्ध तत्परतेने स्वत:चे मत स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. तसेच वारंवार बेछूट आरोप करणारे कोळसे पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा !

सोनभद्र येथे ३ सहस्र टन नव्हे, तर केवळ १६० किलो सोने सापडले !

उत्तरप्रदेश राज्यातील सोनभद्र येथे सोन्याची खाण मिळाल्याचे आणि तेथे ३ सहस्र टन सोने मिळाल्याचे वृत्त २२ फेब्रुवारीला दिवसभर देश-विदेशात पसरले होते….