देशातील ९ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झालेले आहेत. देशातील १०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झालेले आहेत. याप्रमाणे शेकडो गावांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झालेले आहेत. भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन मुसलमानांना स्वतंत्र ‘पाकिस्तान’ नावाचा देश देण्यात आला. त्या वेळी ‘भारतातील सर्व मुसलमानांनी पाकिस्तानमध्ये जावे आणि तेथील सर्व हिंदूंनी भारतात यावे’, असे ठरले होते; मात्र पाकमधील लाखो हिंदूंनी तेथे रहाण्याचा निर्णय घेतला, तर भारतात म. गांधी, नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसने मुसलमानांना ‘भारतात त्यांचे रक्षण केले जाईल’, असे सांगत भारतात रहाण्याचे आवाहन केले. त्यामुळे साडेतीन कोटी मुसलमान भारतात राहिले. आज ७५ वर्षांनी याचा आढावा घेतला, तर पाकिस्तानमधील हिंदू पूर्वी ४ टक्के होते, ते आता एक टक्क्याहून अल्प झाले आहेत, तर भारतातील मुसलमान ९ टक्के होते, ते आता १५ टक्के झाले आहेत. यातून लक्षात येते की, पाकमधील हिंदूंचा वंशसंहार झाला, तर भारतातील मुसलमानांना सर्व सुविधा देऊन त्यांची लोकसंख्या वाढण्यास हातभार लावण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे देशातील कित्येक गावांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. यामुळे काय होते, हे वेगळे सांगायला नको. भारताची फाळणी करतांना जेथे मुसलमान बहुसंख्य होते, तो भाग पाकला देण्यात आला. आताही वर म्हटल्याप्रमाणे जेथे सध्या मुसलमान बहुसंख्य आहेत, तेथे दुसर्या पाकिस्तानची मागणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मुसलमान बहुसंख्यांक नसले, तरी १० ते ३० टक्के आहेत, तेही हिंदूंना भारी पडतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. याच्याच आधारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचले होते. मुंबई शहरातील जवळपास २० ठिकाणी मुसलमान बहुसंख्य होत आहेत. ही मुंबईकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे; कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. उद्या येथे धर्मांधांनी हिंसाचार केला, तर मुंबई ठप्प होण्यास वेळ लागणार नाही. वर्ष २०१३ मध्ये आझाद मैदानात रझा अकादमीच्या मोर्च्याच्या वेळी पोलिसांची झालेली स्थिती आपण पाहिलेली आहे. अशा वेळी पोलीस रक्षण करतील, अशी शक्यताच अल्प आहे. ‘२० ठिकाणी मुसलमान बहुसंख्य होत असले, तरी अन्यत्र १० ते ३० टक्के जरी असले, तरी ते धोकादायकच आहेत’, असेच म्हणावे लागेल. मुंबईत वर्ष १९९२-९३ च्या दंगलीमध्ये हिंदूंनी हा अनुभव घेतला आहे; मात्र त्यालाही आज ३० वर्षे झाली. या ३० वर्षांत परिस्थिती पुष्कळ पालटली आहे. वर्ष १८९३ मध्येही मुंबईतील दक्षिण भागात हिंदु-मुसलमान दंगल झाली होती. मुंबईत हिंदु-मुसलमान दंगलीचा इतिहास राहिलेला आहे. त्या वेळी केवळ दक्षिण मुंबईपुरती मर्यादित राहिलेली दंगल १०० वर्षांनी संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर येथे पसरली होती. आता ती प्रत्येक गल्लीबोळात झाली, तर आश्चर्य वाटू नये. वर्ष १९९२-९३ मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी हिंदूंचे रक्षण केले होते. आज असा आदेश देणारा नेता दिसत नाही. त्या वेळी काँग्रेसचे राज्य होते, तर आता शिवसेना-भाजप यांचे हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. त्यामुळे ‘हिंदूंना त्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा ठेवता येईल’, असे म्हणता येईल.
हिंदुत्वनिष्ठ सरकारने आताच लक्ष द्यावे !
मुंबईत वर्ष १९९७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ११ लाख ८६ सहस्र ३५६ इतकी होती. आता ती ३६ लाखांपर्यंत पोचल्याचे सांगितले जात आहे, तर वर्ष २०२७ पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या ४१ लाखांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्या वाढली असेल, असे वाटत नाही. ही स्थिती जवळपास देशातील प्रत्येक शहरात आणि राज्यात आहे. यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लवकरात लवकर आणून कायद्याच्या अंतर्गत यावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. राज्य आणि केंद्र सरकारांनी मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशात अशा प्रकारे लोकसंख्या वाढीद्वारे तेथील ठिकाणांवर नियंत्रण मिळवण्याविषयी एक धोरणात्मक योजना राबवली पाहिजे. उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांच्या नेपाळच्या सीमेवर लोकसंख्येच्या आधारे भूगोल पालटण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीरपणे चालू आहे. याकडे आता केंद्र सरकार लक्ष देत आहे, तसेच लक्ष देशातील प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, राज्य यांकडे देण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे. त्यातही देहली, मुंबई, कोलकाता आदी महानगरांकडे अधिक आणि लवकर लक्ष दिले पाहिजे; कारण ही शहरे भारताच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. तीच जर धर्मांधांनी ठप्प करून टाकली, तर भारताला मोठी हानी सोसावी लागू शकते. देहलीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळी शाहीन बाग परिसर जवळपास ३ मास मुसलमानांनी बंद करून टाकला होता. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देहलीत असतांनाच तेथे धर्मांधांनी दंगल घडवली. यामुळे देहलीचा काही भाग ठप्प होता. देशाच्या राजधानीत असे होऊ शकते, तर देशातील अन्य कोणत्याही भागात ते कधीही होऊ शकते. काही मासांपूर्वी बेंगळुरू शहरात रात्रीच्या वेळी धर्मांधांनी अचानक एका कथित अवमानकारक व्हॉट्सॲप संदेशावरून दंगल घडवून आणली. पोलीस ठाण्यावरच आक्रमण करण्यात आले. अशी स्थिती असेल, तर पोलीस स्वतःचे रक्षण करणार कि जनतेचे ? हा प्रश्न आहे. यासाठी हिंदूंनी स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ होण्याची आवश्यकता आहे. मुंबईत वर्ष १९९२-९३ मध्ये ज्या मुसलमानबहुल भागात दंगल घडवण्यात आली, तिथे आणि आता जे मुसलमानबहुल भाग झाले आहेत, तसेच काही ठिकाणी १० ते ३० टक्के मुसलमान आहेत, तेथे आतापासूनच विशेष लक्ष देऊन तेथील हिंदूंचे रक्षण कसे करता येईल आणि धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.
देशातील मुसलमानांची वाढती लोकसंख्या दुसर्या फाळणीला कारणीभूत होण्यापूर्वीच तिला लगाम घाला ! |