काँग्रेसला उतरती कळा !

चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्‍या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्‍या प्रकरणातील आरोपी असण्‍यासह बनावट पारपत्र बनवणार्‍यांना पाठिंबा दिल्‍याचा आरोपही त्‍यांच्‍यावर होता.

भारतीय खेळांना प्रोत्‍साहन आवश्‍यक !

भारताने यापुढे क्रिकेटसारख्‍या पाश्‍चात्त्य खेळांना महत्त्व न देता भारतीय खेळांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्‍यासाठी खेळाडूंना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास भारतही यापुढे प्रत्‍येक स्‍पर्धांमध्‍ये अधिक संख्‍येने पदांची लयलूट करतांना दिसेल, हे निश्‍चित !

कावेरी नदीचा गुंता !

सद्यःस्‍थितीत प्रत्‍येक जण हा अधिकारच सांगत आहे आणि दुसर्‍यासाठी त्‍याग करण्‍यास सिद्ध नाही. त्‍यामुळे कावेरी प्रश्‍नासारखे अनेक प्रश्‍न सध्‍या चिघळत आहेत. यातून प्रशासकीय व्‍यवस्‍थेचे अपयश वारंवार अधोरेखित होते आणि सनातन धर्मराज्‍याची (हिंदु राष्‍ट्र) आवश्‍यकता याकडेच आपल्‍याला जावे लागते !

नागपूरच्‍या पूरस्‍थितीला उत्तरदायी कोण ?

‘निसर्गाचा कोप म्‍हणायचा ? कि नियोजनशून्‍यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्‍यानंतरच पावसाळ्‍यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्‍यामेळाव्‍यात कार्यकर्त्‍यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्‍ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्‍या आतापर्यंतच्‍या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्‍तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्‍हणण्‍यास वाव रहातो.

स्थलांतरित भारतीय !

आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्‍हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्‍वगुरु होऊ शकतो !

शास्‍त्रसंमत विसर्जनाचा आग्रह ! Ganesh Visarjan

पर्यावरणाच्‍या नावाखाली शास्‍त्र पालन करण्‍यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्‍याचे, त्‍यातून धर्महानी करण्‍याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्‍यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्‍याने ते स्‍वयंस्‍फूर्तीने शास्‍त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !

भारतीय दंड विधान आणि ‘श्री ४२०’ !

राष्ट्रीयत्वाला धरून कायदे आणि यंत्रणा या गोष्टींमध्ये पालट करणे आवश्यक आहेच; परंतु ‘जुता जापानी, पतलून इंग्लिशस्तानी’, हे गाण्यात ठीक आहे; परंतु न्यायव्यवस्थेमध्ये पोषाख आणि हृदय हे दोन्ही भारतीय संस्कृतीनुरूप असेल, तरच तिची स्थिती सुधारेल !

‘अशुभ’ पावले !

भारतावर कोणत्‍याही माध्‍यमांतून कुरघोडी करण्‍यात येत असेल, तर ती करणार्‍याला त्‍याचे परिणाम भोगावेच लागतील, हे जगाला दाखवून देण्‍याची वेळ आता आली आहे.

महिला आरक्षण आणि विकास !

भारताचा इतिहास पहाता स्‍वबळावर कर्तृत्‍व गाजवणार्‍या महिलांची संख्‍या मोठी आहे. अशा कर्तबगार महिलांमुळे केवळ महिलांचेच नव्‍हे, तर समाजाचेही भले झाले आहे. त्‍यामुळे कर्तृत्‍ववान, विविध गुणांचा समुच्‍चय असणारी महिला केवळ राजकीयच काय, तर कुठलेही क्षेत्र गाजवू शकते, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे.