मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील अध्यात्म अन् आध्यात्मिक स्तरावरील अध्यात्म यांतील भेद 

श्री. निषाद देशमुख

टीप १ – ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे जीव मानसिक आणि बौद्धिक स्तर ओलांडून आध्यात्मिक स्तराकडे जात असतो. त्यामुळे त्याच्या लिखाणात मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरील अध्यात्म अन् आध्यात्मिक स्तरांवरील अध्यात्म दोन्ही संमिश्र असते. त्यामुळे त्या लिखाणात वायुतत्त्व कार्यरत होते.

टीप २ – ६१ टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांचा कल (रुची) त्यांचा योगमार्ग आणि प्रकृती यांनुसार ज्ञान मिळवण्याकडे किंवा तसे लिखाण करण्याकडे असतो. त्यामुळे ज्ञानयोगी जिवांना एखादे ज्ञानयोगी यांनी लिहिलेले मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील लिखाण आवडते. असेच इतर योगमार्गियांच्या संदर्भातही असते. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीनंतर जिवाचा कल मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अध्यात्म अनुभवण्याकडे असतो. त्यामुळे तो विविध प्रकृती असलेल्या आणि विविध योगमार्गातील जिवांकडून अध्यात्मातील तत्त्व शिकू शकतो.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (१४.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक