
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पुढील सारणीनुसार देवतांच्या नामजपांमध्ये पंचतत्त्वांपैकी कोणते तत्त्व किती प्रमाणात (टक्के) असते ?
उत्तर :
टीप १ – गणपतीच्या नामजपात ॐ जोडल्याने त्यातील तेजतत्त्व आणि आकाशतत्त्व यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत पृथ्वीतत्त्व अल्प झाले आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान,आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |