सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी घोषित करण्यापूर्वी कोरोनाच्या पडताळणीचा अहवाल तात्काळ देणे, छोट्या घटकांना आर्थिक सहकार्य देणे यांसह अन्य गोष्टींचे नियोजन करावे ! – आमदार सुधीर गाडगीळ

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय सरकारने घ्यावा.

सातारा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा !

कोरोनाशी दोन हात करतांना लसीच्या तुटवड्यासमवेत आता जिल्ह्यातील रक्तपेढीलाही विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी आता पुढे येऊन रक्तदान करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला शास्त्रानुसार गुढी उभारूनच हिंदु नववर्ष साजरे करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा केवळ हिंदूंचाच नाही, तर संपूर्ण विश्‍वाचा वर्षारंभ आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली. शालीवाहन शकाचा आरंभदिवसही गुढीपाडवाच होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच खरा नववर्षारंभ आहे याला वेदांचे प्रमाण आहेत.

पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजन संपला !

ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजनचा साठा संपला असल्याचे महानगरपालिकेने मान्य केले आहे.

अनिल देशमुख यांच्या स्वीय साहाय्यकांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने जबाब नोंदवला !

मनसुख हिरेन हत्या आणि स्फोटके प्रकरण यांत अटक करण्यात आलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अन्वेषणात कुंदन अन् पालांडे यांनी नावे आली होती. यावरून त्यांचा जबाब केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवला आहे.

महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक बंदीवान !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकीकडे संक्रमित रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण कारागृहामध्ये कोरोनाबाधित बंदीवानांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील सर्व कारागृहांत २३ सहस्र २१७ बंदीवानांची क्षमता असतांना तेथे ३४ सहस्र ३२० बंदीवानांना ठेवण्यात आले आहे.

परमबीर सिंह यांच्या प्राथमिक अन्वेषणाचा गृहविभागाचा आदेश !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील गंभीर आरोप आणि राज्यशासनाला न्यायालयात प्रतिवादी करणे, हे अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियमांचा भंग आहे का ? याविषयी परमबीर सिंह यांच्या प्राथमिक अन्वेषणाचा गृहविभागाचा आदेश !

पुरावे नष्ट केल्याच्या कारणावरून निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी यांना अटक !

पुरावे नष्ट करण्यासाठी काझी यांनी सचिन वाझे यांना साहाय्यक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी मी तुमच्यासह आहे ! – महामंडलेश्‍वर स्वामी रामदेव महाराज

सरकारने पुजार्‍यांची भूमी हडप केली आहे. याविषयी आवाज उठवल्यावर माझीच पिळवणूक करण्यात आली. आज भगव्या पोशाखात लोक भीक मागून भगवा आणि साधू यांची प्रतिष्ठा अल्प करत आहेत. यांसह अन्य काही विषयांवर आपल्याला कार्य करावे लागेल.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले.