
ठाणे, ११ एप्रिल (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजनचा साठा संपला असल्याचे महानगरपालिकेने मान्य केले आहे. पालिकेने तेथील २६ रुग्णांना येथील ग्लोबल रुग्णालयात हालवल्यामुळे तेथेही ताण वाढला आहे आणि ऑक्सिजनची क्षमता न्यून होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असतांनाच पालिकेने संबंधित आस्थापनाकडे मागणी करूनही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता राज्य शासनाने यात लक्ष घालून महानगरपालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर