अनिल देशमुख यांच्या स्वीय साहाय्यकांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने जबाब नोंदवला !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय साहाय्यक कुंदन आणि पालांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषणासाठी समन्स पाठवण्यात आला होता. ११ एप्रिल या दिवशी या दोघांचा जबाब केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवून घेतला आहे.

मनसुख हिरेन हत्या आणि स्फोटके प्रकरण यांत अटक करण्यात आलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अन्वेषणात कुंदन अन् पालांडे यांनी नावे आली होती. यावरून त्यांचा जबाब केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ‘अनिल देशमुख यांनी मासाला १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष दिले होते’, असा गंभीर आरोप केला आहे. अधिवक्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवरून न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची सूचना केंद्रीय अन्वेषण विभागाला दिली आहे. या प्रकरणीही कुंदन आणि पालांडे यांचे अन्वेषण होण्याची शक्यता आहे.