अधिकोषांच्या गोपनीय डाटा चोरीप्रकरणात पुणे येथे ९ जणांना अटक !

अधिकोषांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा गोपनीय डाटा अवैध मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्य टोळीला सायबर गुन्हे शाखेने पकडले आहे.

बारावी जीवशास्त्राच्या पुस्तकात व्याकरणाच्या चुकांसह वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक माहितीच्याही असंख्य चुका !

पुस्तकात व्याकरणाच्या मूलभूत चुकांपासून चुकीची वैज्ञानिक माहिती देण्यापर्यंतच्या चुका असणे हे  गंभीर आणि लज्जास्पद आहे ! यावरून मंडळातील सदस्यांचा अक्षम्य निष्काळजीपणाच उघड होतो !

बैरागी कॅम्पमधील सर्व आखाड्यांना ७ दिवसांत सर्व सुविधा देणार ! – दीपक रावत, कुंभमेळा अधिकारी

हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना किमान पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी साधूसंतांना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? अन्य धर्मियांविषयी प्रशासनाने अशी उदासीनता दाखवली असती का ?

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला १० वर्षांचा कारावास !

बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सी.बी.आय्. न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे.

राज्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

साधारणपणे २ कोटी २० लाख डोस आपल्याला आवश्यक आहेत. येत्या ३ मासांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. साधारण प्रती आठवड्याला २० लाख डोस आवश्यक आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

सनातन संस्थेचा उद्देश ऐकून अनेक जिज्ञासू प्रभावित झाले. त्यांनी ‘सनातनचे कार्य  अतिशय चांगले असून ते हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले.

श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर आतापर्यंत जे होत आले आहे, तेच श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भात होत आहे ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांना सोपवणे आवश्यक आहे अन्यथा मंदिरांची भूमी, संपत्ती सर्व काही सरकार विकून मोकळी होईल !

देशभरात एका मासामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांची वाढ !

गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !