ट्विटरकडून सर्बियाच्या ७ दूतावासांची खाती तडकाफडकी बंद !
‘कोसोवा’ आणि ‘सर्बिया’ या देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे ऋषी सुनक यांनी घेतले भगवान श्रीकृष्णाचे दर्शन
सुनक यांनी वारंवार ‘मी हिंदु असून त्याचा मला अभिमान आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतली होती.
ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो !
शाळांमध्ये शिकणार्या मुलांवर संशोधन केल्यावर शाळेत जातांना शालेय मार्गावर अधिक रहदारी असल्याने मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते, तसेच ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, असे आढळून आले.
ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांमध्ये नाझींच्या चिन्हावर बंदी
ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या २ राज्यांमध्ये नाझींच्या ‘हाकेनक्रूझ’ या चिन्हावर बंदी घालण्यात आली आहे.
जगातील सर्वांत प्राचीन नद्यांपैकी एक ३४६ कि.मी. लांबीच्या थेम्स नदीचा किनारा कोरडाठक्क पडण्याच्या मार्गावर !
ब्रिटनने त्यांच्या देशातील १४ पैकी ८ भाग दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. त्यात डेवोन, कॉर्नवाल, सॉलेंट, साऊथ टाऊ, केंट, दक्षिण लंडन, हर्ट्स, उत्तर लंडन, ईस्ट एंग्लिया, थेम्स, लिंकनशायर, नॉर्थम्प्टनशायर आणि मिडलँड्स या भागांचा समावेश आहे.
सलमान रश्दी यांच्यानंतर आता ‘हॅरी पॉटर’ पुस्तकाच्या लेखिका जे.के. रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी
ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याच खात्यावरून रश्दी यांच्यावर आक्रमण करणारा हादी मातर याचे कौतुक करण्यात आले आहे.
शेष पृथ्वीच्या तुलनेत ४ पटींनी गरम होत आहे आर्क्टिक क्षेत्र ! – संशोधन
मानवाच्या अनियंत्रित आणि अविचारीपणे केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचाच हा दुष्परिणाम !
माँटीनीग्रो देशात झालेल्या गोळीबारात ११ जण ठार
३४ वर्षीय बंदुकधार्याला एका नागरिकाने गोळीबार करून ठार मारल्यावर हा प्रकार थांबला. पंतप्रधान द्रिटॅन अॅबेझोविक यांनी या घटनेविषयी तीन दिवस शोक प्रकट करण्याचे घोषित केले आहे.
युरोपात दुष्काळामुळे हाहा:कार !
नैसर्गिक संकटाची तीव्रता ! स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले. या देशांत जुलै मासात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान नोंदवले गेले. स्पेनमध्ये उष्णतेने तर ६० वर्षांचा विक्रम मोडला !