ब्रिटनमध्ये १४ पैकी ८ भाग दुष्काळग्रस्त घोषित
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या पर्यावरण संस्थेने त्यांच्या देशातील १४ पैकी ८ भाग दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. त्यात डेवोन, कॉर्नवाल, सॉलेंट, साऊथ टाऊ, केंट, दक्षिण लंडन, हर्ट्स, उत्तर लंडन, ईस्ट एंग्लिया, थेम्स, लिंकनशायर, नॉर्थम्प्टनशायर आणि मिडलँड्स या भागांचा समावेश आहे. वर्ष १९३५ नंतर ब्रिटनमध्ये जुलै हा सर्वाधिक भीषण दुष्काळी मास ठरला. येथे सरासरी केवळ ३५ टक्के पाऊस पडला.
Source of Britain's River Thames driest ever as drought nears https://t.co/yJkTbXR5I5 pic.twitter.com/9sC2HEySg1
— Reuters (@Reuters) August 12, 2022
ब्रिटनचे जलमंत्री स्टीव्ह डबल म्हणाले की, या संकटाला तोंड देण्याची आमची सिद्धता आहे. परिस्थितीवर आमचे लक्ष आहे. वाढती उष्णता, उष्णतेची लाट आणि अल्प पाऊस यांमुळे जगातील सर्वांत प्राचीन नद्यांपैकी एक असलेल्या ३४६ कि.मी. लांबीच्या इंग्लंडच्या ‘थेम्स’ नदीचा किनारा कोरडाठक्क पडण्याच्या मार्गावर आहे. असे प्रथमच झाल्याने तज्ञही चकित झाले आहेत.