ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे ऋषी सुनक यांनी घेतले भगवान श्रीकृष्णाचे दर्शन

लंडन – श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने भक्ती वेदांत मंदिरात आयोजित कार्यक्रमाला ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे भारतीय वंशाचे उमेदवार ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती उपस्थित होते. हे मंदिर ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’ अर्थात् ‘इस्कॉन’द्वारे चालवण्यात येते. या वेळी सुनक आणि त्यांच्या पत्नी यांनी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

सुनक यांनी वारंवार ‘मी हिंदु असून त्याचा मला अभिमान आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतली होती.