ग्रीक महिलेची तिच्या पाकिस्तानी पतीने केली हत्या !

पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ती तिच्या पाकिस्तानी पतीसमवेत त्या इमारतीत रहात होती. पतीनेच तिची हत्या करून तो पाकिस्तानला पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रिन्स चार्ल्स बनले ब्रिटनचे नवे राजे !

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९६ वर्ष) यांचे ८ सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा स्कॉटलंड येथे निधन झाले. महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव स्कॉटलँडहून शाही रेल्वेने बकिंघम पॅलेस या ठिकाणी आणले जाणार आहे.

भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून नियुक्त

४२ वर्षीय सुएला यांनी यापूर्वी ब्रिटन सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. याआधी त्या बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल म्हणून कार्यरत होत्या.

ब्रिटनमध्ये पाकिस्तानी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण होत असल्याचा व्हिडिओ प्रसारित  

ब्रिटनमधील भारतीय वंशाचे राजकारणी ऋषी सुनक यांनी याची नोंद घेऊन हिंदूंच्या रक्षणासाठी आणि धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

लिज ट्रस ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान

ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून लिज ट्रस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ४७ वर्षांच्या ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असणार आहेत.

कॅनडामध्ये १३ ठिकाणी चाकूद्वारे झालेल्या आक्रमणात १० जण ठार, तर १५ जण घायाळ

कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात जवळपास १३ ठिकाणी चाकूचा वापर करून करण्यात आलेल्या आक्रमणामध्ये १० जण ठार, तर जवळपास १५ जण घायाळ झाले आहेत. या प्रकरणी डेमियन सँडरसन (वय ३१ वर्षे) आणि माइल्स सँडरसन (वय ३० वर्षे) या आक्रमणकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

अमेरिकेनंतर आता पोलंडमध्ये अमेरिकी नागरिकाकडून भारतीय वंशाच्या व्यक्तीवर वर्णद्वेषी टीका

अमेरिकी सरकार आणि प्रशासन एरव्ही भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात असल्याची ओरड करतात; मात्र अमेरिकी नागरिक कशा प्रकारे वागतात, याकडे ते दुर्लक्ष करतात, यातून त्याचा दुटप्पीपणा लक्षात येतो ! याविषयी भारत सरकारने अमेरिकेकडे निषेध नोंदवला पाहिजे !

चीनच्या शिनजियांगमध्ये मुसलमानांचा छळ होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून उघड

आता संयुक्त राष्ट्रे चीनला यविषयी जाब विचारून मुसलमानांचा होत असलेला छळ थांबवण्याचे धाडस दाखवतील का ?

पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू

पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेल्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे.

इटलीत कट्टर उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे !

बेनेट मुसोलिनी याच्यानंतर प्रथमच इटलीमध्ये प्रखर राष्ट्रवादाचे वारे घोंघावू लागले आहेत.तेथील ‘ब्रदर्स ऑफ इटली’ नावाचा राजकीय पक्ष सध्या आघाडीवर आहे.