युरोचे अवमूल्यन : अमेरिकन डॉलरपेक्षा स्वस्त !

युरोपमध्ये आर्थिक मंदीच्या टांगत्या तलवारीचा परिणाम !

ब्रुसेल्स (बेल्जियम) – रशियाकडून नैसर्गिक वायू आणि तेल यांची आयात लवकरच बंद होणार असल्याने युरोपीय देश झपाट्याने आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशातच आता ‘युरो’ या युरोपियन युनियनच्या चलनाचे अवमूल्यन झाले असून ते अमेरिकन डॉलरपेक्षाही स्वस्त झाले आहे. वर्ष २००२ नंतर प्रथमच युरोला एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

सध्या युरोची किंमत ०.९९३५ अमेरिकन डॉलर एवढी घसरली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू झालेल्या संघर्षाच्या आधी, म्हणजे फेब्रुवारी २०२२ पर्यंत हीच किंमत १.१५ अमेरिकन डॉलर होती. मॉर्गन स्टॅनले या जगप्रसिद्ध बँकेने व्यक्त केलेल्या अनुमानानुसार ही किंमत ०.९७ अमेरिकन डॉलरपर्यंत घसरेल, तर ‘नॉमुरा इंटरनॅशनल’ नावाच्या आस्थापनानुसार सप्टेंबरनंतर युरोचे मूल्य हे ०.९५ अमेरिकन डॉलर किंवा त्याहूनही अल्प होऊ शकते.