हेल्सिंकी (फिनलँड) – जागतिक तापमान वाढीमुळे जगाला नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने विविध संकटांना तोंड देण्यास आरंभ करावा लागलाच आहे. अशातच आर्क्टिक क्षेत्रामधील बर्फ हा पृथ्वीच्या सरासरी तापमान वाढीपेक्षा चार पट अधिक गतीने वितळत आहे, असा धक्कादायक खुलासा येथील ‘फिनिश मिटियरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ने एका वैज्ञानिक अहवालातून केला आहे. आर्क्टिक क्षेत्र हे गेल्या ४० वर्षांमध्ये पृथ्वीवरील अन्य भागांच्या तुलनेत चार पट अधिक गतीने गरम झाले आहे, असे यात सांगण्यात आले आहे.
Arctic Warming: दुनिया के बाकी हिस्सों की तुलना में चार गुना अधिक तेजी से गर्म हो रहा आर्कटिक, नए शोध में बड़ा खुलासा#Arctic #GlobalWarminghttps://t.co/bRAUEr7l6q
— India TV Hindi (@IndiaTVHindi) August 13, 2022
नॉर्वे आणि फिनलँड येथील संशोधनकर्त्यांच्या एका गटाने वर्ष १९७९ पासून उपग्रहांच्या माध्यमातून एकत्रित केलेल्या माहितीचा अभ्यास केला. वैज्ञानिकांना हे लक्षात आले की, आर्क्टिकचे तापमान प्रत्येक दशकात ०.७५ अंश सेल्सियसने वाढत आहे. हे प्रमाण पृथ्वीवरील अन्य ठिकाणांच्या चौपट आहे.
२० फुटांहून अधिक वाढू शकते समुद्रातील पाण्याचा स्तर !आर्क्टिक क्षेत्रातील काही भागांतील तापमान हे सरासरीपेक्षा तब्बल ७ पटींनी वाढत आहे. संशोधनकर्त्यांपैकी अँटी लिपपोनन यांचे म्हणणे आहे की, हवामान पालट हा मनुष्यामुळे झाला आहे. जसजसा आर्क्टिक गरम होईल, तसतसे तेथील ‘ग्लेशियर’ वितळतील. यामुळे जगभरातील समुद्रांचा जलस्तर वाढेल. ‘ग्रीनलँड आइस शीट’मध्ये एवढे पाणी आहे की, महासागरांचा जलस्तर हा २० फूटांनी म्हणजे ६ मीटरने वाढू शकतो. |
संपादकीय भूमिकामानवाच्या अनियंत्रित आणि अविचारीपणे केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचाच हा दुष्परिणाम ! |