(म्हणे) ‘छत्तीसगडमध्ये भाजपच्या खासदाराकडून माझ्या मृत्यूसाठी यज्ञ !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्‍वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.

बीड येथे ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

तालुक्यातील घारगाव ते अंजनवती या ६ ते ७ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास शासनाची अनुमती

राज्यातील ऊस गाळप हंगामाचे कारण पुढे करत ३ मासांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती राज्य सरकारने २ फेब्रुवारीला मागे घेतली आहे.

रेल्वेस्थानकात ‘हिंदुस्थान’ लिहिलेली विदेशी शौचालयाची भांडी काढून टाकण्याची मागणी !

हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.

यवतमाळ जिल्हा विधीसेवा प्राधिकरण याच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा !

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालय येथील सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला.

आमचे ऐकले नाही, तर देशभरात ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरणार ! – राकेश टिकैत यांची केंद्र सरकारला चेतावणी

आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही, तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात मोर्चा काढू.

नाशिक येथील साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी

आगामी साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने भगूर येथे त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

पुण्यात स्थानिकांच्या साहाय्याने गुन्हे करणारी नायजेरियन टोळी अटकेत

सामाजिक संकेतस्थळावर मित्र होण्यासाठीची मागणी पाठवून नंतर खरेदीच्या निमित्ताने फसवणूक करणार्‍या एका नायजेरियन टोळीला नगरच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्याच्या पथकाने पुण्यात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले.

उंचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेना

उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून  गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात.