
कोल्हापूर, ३ फेब्रुवारी – उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्यात वाहनधारकांचे अपघातही झालेले आहेत. उंचगावची मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा ही २ मासांवर आली आहे. या काळात उंचगावमध्ये प्रचंड गर्दी होत असते. तरी उंचगाव स्वागत कमान ते आंबेडकर चौक रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील अभियंता विजय कांडगावे यांना देण्यात आले. हे डांबकरीकरण लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाची चेतावणी याप्रसंगी करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव यांनी दिली आहे.
या वेळी सर्वश्री दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, कैलास जाधव, योगेश लोहार, भूषण चौगुले, नितीन गाणबोटे आदी उपस्थित होते.
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !