आमचे ऐकले नाही, तर देशभरात ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरणार ! – राकेश टिकैत यांची केंद्र सरकारला चेतावणी

नवी देहली – आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही, तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात मोर्चा काढू. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात आम्ही प्रवास करू. येथील आंदोलनदेखील चालू राहील. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी चेतावणी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिली. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर राकेश टिकैत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही चेतावणी दिली.