भारतानंतर आता चीनला मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि नेपाळ यांचा विरोध

चीनने त्याच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेश, दक्षिण चीनी समुद्र आदींचा समावेश केल्याचे प्रकरण !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नेपाळचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा नकार !

नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्याने त्यांना हिंदु आणि हिंदु राष्ट्र यांची अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नकार दिल्याने आश्‍चर्य वाटत नाही !

गोरखा सैनिकांच्या भारतीय सैन्यातील भर्तीवर नेपाळने ठोस निर्णय घेतलेला नाही !

नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले.

नेपाळमध्ये चीनने उभारलेल्या विद्युत् प्रकल्पांमध्ये निर्माण केलेली वीज भारत खरेदी करणार नाही !

भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.

नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता

नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट पर्वताजवळ एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरने सकाळी सवादहा वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील १० मिनिटानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि ५ विदेशी नागरिक होते.

नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील १० किलो वजनाचे सोन्याचे दागिने गायब !

‘पशुपतीनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे संचालक घनश्याम खतिवड म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात सुरक्षा कर्मचार्‍यांसह नेपाळी सैन्याचे सैनिक तेथे तैनात करण्यात आले आहेत.

‘आदिपुरुष’सह सर्व हिंदी चित्रपटांवर काठमांडूमध्ये बंदी !

सीतामाता भारताची मुलगी असल्याच्या संवादावर आक्षेप !

भारताच्या संसदेत लावण्यात आलेले अखंड भारताचे मानचित्र हे राजनैतिक नाही, तर सांस्कृतिक ! – नेपाळचे पंतप्रधान ‘प्रचंड’

नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती.

नेपाळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत होत आहे घट, तर मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या संख्येत वाढ !  

भारताप्रमाणेच पुढील काही दशकांनंतर नेपाळही हिंदू अल्पसंख्यांक असणारा देश झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच भारत आणि नेपाळ येथे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या मानचित्रावर नेपाळच्या माजी पंतप्रधानांचा आक्षेप

अखंड भारताच्या मानचित्राद्वारे भारताचा इतिहास दाखवण्यात आला आहे, जो कधीही नाकारता येणार नाही. पूर्वी भारत अखंड होता आणि त्यात कोणते प्रदेश होते, हेच त्यात दर्शवण्यात आले आहे, यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल, तर ती हास्यास्पदच म्हणावी लागेल !