नेपाळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत होत आहे घट, तर मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या संख्येत वाढ !  

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील वर्ष २०२१ मधील जनगणनेची आकडेवारी आता समोर आली आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीनुसार नेपाळमधील बहुसंख्यांक हिंदूंची एकूण लोकसंख्या ८१.१८ टक्के इतकी आहे. म्हणजे नेपाळमध्ये २ कोटी ३६ लाख ७७ सहस्र ७४४ हिंदू असून दुसर्‍या स्थानावर ८.२ टक्के लोकसंख्या असणारे बौद्ध आहेत. त्यांची लोकसंख्या २३ लाख ९४ सहस्र ५४९ इतकी आहे. मुसलमान ५.०९ टक्के, म्हणजे १४ लाख ८३ सहस्र ६० इतके आहेत. असे असले, तरी हिंदूंच्या लोकसंख्येत ०.११ आणि बौद्धांच्या लोकसंख्येत ०.७९ टक्के घट झाली आहे. त्याच वेळी मुसलमान ०.६९, तर ख्रिस्ती ०.३६ टक्क्यांनी वाढले आहेत. ही संख्या अल्प असली, तरी हिंदू आणि बौद्ध यांच्या लोकसंख्येच्या घटत्या प्रमाणात ही संख्या नोंद घेण्याइतकी आहे.

संपादकीय भूमिका

भारताप्रमाणेच पुढील काही दशकांनंतर नेपाळही हिंदू अल्पसंख्यांक असणारा देश झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच भारत आणि नेपाळ येथे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !