नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे सरकार विसर्जित
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.
भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थितीती आणि दोन्ही देशांतील संबंध यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळ सरकारची चीनसमर्थित धोरणे पहाता तेथील हिंदु जनतेने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याच्या मागणीस आरंभ केला आहे. यासाठी त्यांनी दुचाकीफेरी काढून साम्यवादी पक्षाच्या के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विरोध केला.
नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
जगात ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध आदी धर्मियांसाठी अनेक स्वतंत्र देश आहेत; पण भारत आणि नेपाळ या देशांत बहुसंख्य असलेल्या हिंदूंना स्वतःचे असे एकही राष्ट्र नाही. यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बलराम बनिया यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. ते येथील ‘कांतीपूर डेली’ नावाच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक होते. १० ऑगस्ट या दिवशी ते अचानक बेपत्ता झाले आणि १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला.
चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !