काठमांडू (नेपाळ) – भारताच्या नव्या संसदेत अखंड भारताचे लावण्यात आलेले मानचित्र (नकाशा) हे राजनैतिक नव्हे, तर सांस्कृतिक आहे, अशी माहिती नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी नेपाळच्या संसदेत दिली. नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती. अखंड भारताच्या मानचित्रात नेपाळला भारताचा भाग दाखवण्यात आल्याने विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून प्रचंड यांनी ही माहिती दिली.
‘नई संसद में अखंड भारत का नक्शा सांस्कृतिक है, ना कि…’, विपक्ष के सवाल पर बोले नेपाल के पीएम पुष्प कमल दहल प्रचंड#AkhandBharatMap #Nepal #NewParliament https://t.co/yMhXw9cQGJ
— ABP News (@ABPNews) June 7, 2023
पंतप्रधान प्रचंड नुकतेच भारताच्या दौर्यावर होते. त्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी भेट घेतली होती. तेव्हा प्रचंड यांनी या मानचित्राविषयी मोदी यांच्याकडे विचारणा केली असता मोदी यांनी ते सांस्कृतिक मानचित्र असल्याचे सांगितले होते. ही माहिती प्रचंड यांनी नेपाळी संसदेत दिली.