राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही ! – लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ योजनेच्या कार्यवाहीसाठी गोवा शासन नियुक्त २७ सदस्यीय समितीचे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे अध्यक्ष आहेत.

गोवा शासनाने जकात कायद्यात पालट करू नये !  दिगंबर कामत

सुधारित कायद्यानुसार काजूचा लिलाव करणे बंद केले जाणार आहे.

कोरोनाच्या पश्‍चात उद्भवणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आदींचा मोठा हातभार ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

कोरोनाच्या पश्‍चात उद्भवणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आणि तत्सम उपाचारपद्धती यांचा जगाला मोठा हातभार लागत आहे.

राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेवून स्वतःतील शौर्य जागृत करा ! – कु. सरिता मुगळी

आजची युवा पिढी स्वैराच्या नावाखाली स्वतः गुलामगिरीत अडकत आहे. सध्याची निधर्मी शिक्षणव्यवस्था आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांच्यामुळे अनेक युवती ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रात अडकून देशद्रोही कृत्ये करत आहेत.

सिंधुदुर्गात केवळ २ नवीन कोरोनाबाधित

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १७० झाली आहे.

विवाह करण्याचे आमीष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा नोंद

सध्या विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार करणे, बलात्कार करणे, अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतातील कट्टरतावादाच्या तपासणीच्या अभ्यासाला मान्यता यू.ए.पी.ए. कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचीही सूचना

हा अभ्यास जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र आणि केरळ अशा ४ राज्यांत केला जाईल. या राज्यात कट्टरतावादाची बहुसंख्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

चुलत भाऊ आणि बहीण यांचा विवाह अवैधच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

लुधियानातील एका २१ वर्षांच्या मुलावर अपहरण आणि अत्याचार यांचा गुन्हा नोंद असून त्याने या प्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपी तिचा चुलतभाऊ आहे.

देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.

गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !