चुलत भाऊ आणि बहीण यांचा विवाह अवैधच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

चंडीगड – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चुलत भाऊ अन् बहीण एकमेकांशी विवाह करू शकत नाही आणि अशा प्रकारचा विवाह अवैध आहे, असे एका निर्णयात स्पष्ट केले.

लुधियानातील एका २१ वर्षांच्या मुलावर अपहरण आणि अत्याचार यांचा गुन्हा नोंद असून त्याने या प्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात तिच्या पालकाने तक्रार केली असून आरोपी तिचा चुलतभाऊ आहे.