विवाह करण्याचे आमीष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा नोंद

मालवण – युवतीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर विवाह करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी शहरातील एका युवकावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद करून त्याला कह्यात घेतले आहे. याविषयी संबंधित युवतीने माटुंगा, मुंबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेथून ही तक्रार मालवण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दयानंद याने विवाह करण्याचे आमीष दाखवून जून मासात शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र तो विवाह करण्यास टाळाटाळ करू लागला. (सध्या विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार करणे, बलात्कार करणे, अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एखाद्या पुरुषाने विवाहाचे आमीष दाखवले, तरी स्त्रिया शारीरिक संबंध ठेवण्यास कशा सिद्ध होतात ? विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे धर्मशास्त्रविरोधी आहे. हे समाजाला न शिकवल्यामुळे आणि पाश्‍चात्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंधानुकरणामुळेच ही परिस्थिती  ओढवली आहे ! – संपादक)