कोणत्याही अफवांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी

आपले शास्त्रज्ञ आणि तज्ञ यांना जेव्हा स्वदेशी लसीची सुरक्षितता अन् परिणामकारकता यांविषयी निश्‍चिती झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपत्कालीन वापरास अनुमती दिली. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि अपप्रचार यांपासून सावध रहावे.

सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा मेळावलीवासियांचा निर्णय

आयआयटी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या भूमीचा मालकीहक्क सरकारकडे आहे, तो मागे घेतल्याविना आणि ग्रामस्थांच्या विरोधातील पोलिसांत नोंद केलेले खटले मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्णय मेळावलीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

महादेवाचे केरवडे गावातील भ्रमणभाषच्या मनोर्‍याचे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशी गावासाठी वर्ष २०१७ – २०१८ मध्ये भारत दूरसंचार निगमचा (बीएस्एन्एल्) मनोरा (टॉवर) संमत झाला आहे. असे असूनही ३ वर्षांमध्ये केवळ त्याच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झाले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर ! – राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठीच्या निधीसमर्पण मोहिमेला पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून प्रारंभ

अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावरील २.७ एकर भूमीत ५७ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्रामध्ये पुढील ३ वर्षांत भव्य अशा राममंदिराची उभारणी केली जात आहे. या अनुषंगाने उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली गोवा समर्पण निधी समितीने गोव्यात निधी समर्पण मोहिमेला प्रारंभ केला आहे.

नागपूर खंडपिठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस

‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे.

अनेक वर्षांपासून कुळाचार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात श्री सरस्वती देवीची प्रतिमा वापरून स्तवन करतो ! – मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

‘श्री सरस्वती देवीची प्रतिमा ही कुठल्या धर्माचे प्रतीक नाही, तर ती विद्येची देवता आहे.

कोरोनाची लस घेतली तरी मास्क वापरणे आवश्यक – मुख्यमंत्री

कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.

रुग्णालयातील उपकरणांच्या देखभालीकडे चेन्नई येथील आस्थापनाचे दुर्लक्ष !

उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागलI.

अधिकार्‍यांच्या स्थानांतराचा डॉ. लहाने यांनी घेतलेला निर्णय ‘मॅट’कडून रहित

डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्‍हेकर यांनी दिला आहे.