(म्हणे) ‘भगवान अय्यप्पा आणि सर्व देवता माकपच्या समवेत !’ – केरळचे हिंदुद्वेषी मुख्यमंत्री पिनराई विजयन्

आता निवडणूक जिंकण्यासाठी हिंदूंची मते मिळावीत, यासाठी ‘देव नाही’, असे म्हणणार्‍या नास्तिकतावादी माकपवाल्यांना हिंदूंच्या देवतांची आठवण झाली आहे, हेच यातून लक्षात येते !

हॅकर्सनी बँकेतून खातेदारांचे ऑनलाईन पैसे काढल्यास १० दिवसांत पैसे परत मिळणार !

हॅकर्सकडून बँकेतून पैसे काढण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने रिझर्व्ह बँकेने खातेदारांना हे पैसे परत मिळतील, यासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत.

जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

पंतप्रधान मोदी यांची मुसलमानांकडे मतांचे आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

आठवड्याच्या शेवटी घोषित केलेली दळणवळण बंदी कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशी प्रभावी नाही ! – केंद्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाला सूचना

राज्यशासनाचे लक्ष दळणवळण बंदीवर न रहाता कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यावर असायला हवे. रात्रीची संचारबंदी आणि आठवड्याच्या शेवटी (‘वीक एंड’ला) घोषित करण्यात आलेली दळणवळण बंदी यांचा कोरोनाच्या संक्रमणावर फारच मर्यादित प्रभाव पडतो.

सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन

दळणवळण बंदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार्‍यांत असंतोष

व्यापार्‍यांनी ‘या दळणवळण बंदीला आमचा विरोध असून पोलिसांना गुन्हे नोंद करायचे असतील, तर त्यांनी ते करावेत; मात्र आम्ही आमची दुकाने उघडणार’, असा पवित्रा घेतला आहे.

ससून रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांची संपावर जाण्याची चेतावणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असणे गंभीर आहे.

नवी मुंबई आणि पनवेल येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद; व्यापार्‍यांचे आंदोलन !

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १ मास कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरांतील दुकाने ६ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आली होती.

महावितरणवर ३९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज, तर ७१ सहस्र कोटी रुपयांची वसुली शेष

सद्यःस्थितीत महावितरणवर ३९ सहस्र कोटी रुपये इतके कर्ज आहे. प्रतिमासाला कर्जापोटी २ सहस्र कोटी रुपये इतका निधी महावितरणला द्यावा लागत आहे. सद्यःस्थितीत महावितरणची ७१ सहस्र कोटी रुपयांची वसुली शेष आहे.

प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. मी स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करीन. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.