७ सहस्र ५०० झाडांच्या कत्तलीविरोधात तरुणांचे पुणे येथे ‘चिपको’ आंदोलन !

नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी !

शेतकर्‍यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ! – विश्वास पाठक, महावितरणचे स्वतंत्र संचालक

शेतकर्‍यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वर्ष २०२५ पर्यंत ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २८ सहस्र एकर भूमीवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व !

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहेत.

सहकार भारतीची आज आणि १ मे या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ! – विवेक जुगादे

सहकारात संस्कार आणणे आणि प्रशिक्षण देणे यांसाठी मुख्यत्वेकरून कार्यरत अशा, तसेच सहकार क्षेत्रासाठी गेली ४५ वर्षे काम करणार्‍या सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी कणेरी मठ येथे होत आहे.

महिलांचे शरीर जितके झाकलेले असले, तितके योग्यच ! – अभिनेता सलमान खान

सलमान खान हे सामान्य जनतेतल्या मनातील बोलले आहेत. ही अश्‍लीलता बंद करण्यासाठी सलमान खान यांच्यासारख्या वलयांकित अभिनेत्यांनी पुढाकार घ्यावा !  

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि असा युगांचा क्रम असतो; परंतु जेव्हा व्यक्ती धर्माचरण किंवा साधना करते, तेव्हा ती हळूहळू मागील युगामध्ये म्हणजे परमात्म्याकडे प्रवास करते. या अमृत महोत्सवानिमित्त परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा द्वापरयुगाकडून सत्ययुगाकडे प्रवास करत आहेत, असे वाटते.

देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमान मारहाणीच्या प्रकरणी दोषी !

७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता !

पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

लुधियाना (पंजाब) येथे वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू

वायू गळतीच्या घटनेमुळे अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन हा संपूर्ण परिसर बंद केला. या वायू गळतीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.