देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमान मारहाणीच्या प्रकरणी दोषी !

७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता !

आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमान

देहली – येथील सीलमपूर क्षेत्राचे आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी आसमा यांनी मारहाण अन् जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. वर्ष २००९ मध्ये या दोघांनी एका सरकारी शाळेतील प्राध्यापिकेला मारहाण करणे, तसेच तिला घाबरवणे अन् धमकावणे या गुन्ह्यांच्या संबंधी ‘राउज एवेन्यू न्यायालया’ने सुनावणी केली.

आमदार अब्दुल रहमान आणि आसमा यांना ७ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो. नियमानुसार एखाद्या आमदाराला २ वर्षांहून अधिकची शिक्षा झाली, तर त्याचे विधानसभेचे सदस्यत्व रहित करण्यात येते. रहमान या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार आहेत. रहमान यांच्या विरोधात एका महिलेची छेड काढून तिला मारहाण केल्याचा गुन्हाही नोंद आहे. मार्च २०२१ मध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारांचा भरणा असलेला आम आदमी पक्ष !