
छत्रपती संभाजीनगर – राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहेत. सायं. ६ पर्यंत १४७ पैकी १३१ बाजार समित्यांचे निकाल हाती आले असून त्यामध्ये ७६ जागा महाविकास आघाडीला आणि ३१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. उर्वरित तडजोडीच्या युतीला मिळाल्या आहेत.
सौजन्य एबीपी माझा
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १८ पैकी ११ जागा भाजप-शिंदे गटाच्या कह्यात गेल्या आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ ४ जागांवर विजय मिळवता आला आहे, तर उरलेल्या ३ जागांवर इतर अपक्ष यांचा विजय झाला आहे.
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती