राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे २८ मार्चला घोषित करणार ! – अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९९ टक्के जागा अंतिम झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २६ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी अजित पवार म्हणाले की, महायुतीमधील मुख्य प्रचारकांची (स्टार प्रचारक) नावे अंतिम झाली आहेत. लवकरच ती घोषित करण्यात येतील. रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सुनील तटकरे यांना देण्यात येणार आहे. महायुतीमध्ये कोणताही अपसमज नाही.