शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिरात साधेपणाने नवरात्रोत्सव

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने चतु:श्रृंगीदेवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अ‍ॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी

महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अ‍ॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी

कृषी विधेयकाचा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना लाभ ! – पृथ्वीराज चव्हाण

मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य ! – उच्च न्यायालय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य असून त्यातून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

निधन वार्ता

सनातन संस्थेचे साधक मनोहरपंत शंकरराव तेलसिंगे (दादा) (वय ८५ वर्षे) यांचे २० ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते हटकर कोष्टी समाजाचे शहराध्यक्ष होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार आहे. जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीपासून २१ दिवसांपर्यंत विविध कालावधींचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १० सहस्र ४१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू झाला आहे.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.