‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अ‍ॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी

मुंबई – ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ या आस्थापनांनी जसे दक्षिण भारतातील भाषांना प्राधान्य दिले आहे अन् त्या ठिकाणी त्यांच्या भाषेत ‘अ‍ॅप’ चालू केले आहे, तसे महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अ‍ॅप’ चालू करावे. अन्यथा दिवाळीचा सण मनसेच्या पद्धतीने साजरा होईल, अशी चेतावणी मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. या दोन्ही आस्थापनांच्या कार्यालयांना भेट देऊन त्यांनी ही चेतावणी दिली.