निधन वार्ता

इचलकरंजी – येथील सनातन संस्थेचे साधक मनोहरपंत शंकरराव तेलसिंगे (दादा) (वय ८५ वर्षे) यांचे २० ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते हटकर कोष्टी समाजाचे शहराध्यक्ष होते. मनोहरपंत तेलसिंगे यांची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव काम होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुले, ३ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार तेलसिंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.