जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध !

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ १६ जानेवारी दिवशी होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सतत गुरुचरणांचा ध्यास असणार्‍या जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर (वय ६१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६ जानेवारी या दिवशी श्रीमती उषा बडगुजर यांचा ६१ वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी ही आनंदवार्ता दिली.

महिलांनी कायद्यांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक ! – अधिवक्त्या सौ. अमृता मोंडकर

देशात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. महिला आणि मुलींना संरक्षण यांसाठी अनेक कायदे देशात अस्तित्वात आहेत. महिलांनी या कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.

भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत रूप म्हणजे स्वामी विवेकानंद ! – प्रा. अरुण मर्गज

विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्‍वबंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचे वैश्‍विक सत्य, धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे, ते खरे शिक्षण !

करवीर तालुका महिला आघाडी आणि करवीर शिवसेना यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन ! 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मातेने स्वत:च्या मुलाला राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध करावे आणि मुलावर संस्कार करावे. 

वणीत धर्मांध क्रिकेट बुकींना अटक

क्रिकेटच्या सट्ट्यातही धर्मांधांचा सहभाग !
जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या आदेशाने विशेष पथकाने आमेर हॉटेलमधून ४ धर्मांधांसमवेत ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेल्वेच्या अवैध तिकीटविक्री प्रकरणी तीन दलालांना अटक

मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्‍या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.

नियम-अटी यांचे पालन करून शिवजयंती साजरी करू !

शिवजयंती उत्साहातच झाली पाहिजे ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बैठकीत चर्चा नाही

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याविषयी चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या टि्वटर हॅण्डलवर ‘धाराशिव-उस्मानाबाद’ असा उल्लेख

शिवसेना शहरांच्या नामांतरणाच्या विषयी सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.