मुख्यमंत्री कार्यालयाच्या टि्वटर हॅण्डलवर ‘धाराशिव-उस्मानाबाद’ असा उल्लेख

शिवसेना शहरांच्या नामांतरणाच्या विषयी सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

पिंपरी शहरात दहशत पसरवणार्‍या दोन टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई

निगडीमधील अमोल वाले टोळी आणि पिंपरीतील धर्मेश पाटील टोळी यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली

भंडारा येथे विश्रामधामवर झालेल्या मांसाहार मेजवानीचे राज्यभरात संतप्त पडसाद

भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर मंत्र्यांच्या ताफ्यातील कर्मचार्‍यांनी भंडारा भेटीच्या निमित्ताने रात्री मेजवानी केली .

कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक आरक्षण उठवण्याचे षड्यंत्र हाणून पाडू ! – नितीन शिंदे, माजी आमदार

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कृतींसाठी असलेल्या भूमीवरील आरक्षण उठवण्यासाठी प्रयत्न चालू आहे.

सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही ! – जयंत पाटील

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वरील आरोपांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात पाच दिवसांत १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अरुणा धरण प्रकल्पग्रस्ताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या)  बुडित क्षेत्रात घर आणि भूमी जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच निवासी भूखंडाची ताबा पावती मिळालेली नाही. त्यामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शांताराम नागप यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पहाता त्यांनी तात्काळ त्यागपत्र द्यायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानासाठी स्थानिक सुट्टी

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ दिवशी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. हा दिवस  कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे.

‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

राज्यातील परभणी जिल्ह्यात कोंबड्या आणि कावळे यांचा ‘बर्ड फ्ल्यूू’ च्या संसर्गाने मृत्यू झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि नागरिक यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.