सतत गुरुचरणांचा ध्यास असणार्‍या जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर (वय ६१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीमती उषा बडगुजर

जळगाव – सतत गुरुचरणांचा ध्यास, परिस्थिती स्वीकारणे, वक्तशीरपणा, इतरांचा विचार करणे, पुढाकार घेणे, काव्यांच्या माध्यमातून गुरुचरणी लीन होणे अशी विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या, हे आनंददायी वृत्त सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ६ जानेवारी या दिवशी घोषित केले. ६ जानेवारी (मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी) या दिवशी श्रीमती उषा बडगुजर यांचा ६१ वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी ही आनंदवार्ता दिली. त्यानंतर उपस्थित सर्वांचीच भावजागृती झाली.