येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा

केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत.

सनदशीर मार्गांनी केलेल्या प्रयत्नांना ईश्वरी साहाय्य मिळते ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मप्रेमींची विदर्भस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत …

पिसाळलेल्या श्वानाच्या आक्रमणात युवक आणि युवती यांचा मृत्यू

संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी प्रबोधन करा !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याविषयी प्रबोधन करण्यासह ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

हिंदु धर्म, देवता आदींचा होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा कायदा करा !

गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, चित्रपट, विज्ञापने आदींच्या माध्यमांतून हिंदु देवता, साधू, संत आदींचा अवमान करण्यात येत आहे. याचा हिंदूंकडून विरोधही केला जात आहे; मात्र कठोर कायदा नसल्याने आरोपींवर कठोर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत.

नोकरीचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेने व्यवसायासाठी जागा द्यावी आणि कह्यात घेतलेले साहित्य परत द्यावे, यासाठी रवि जाधव यांचे उपोषण ४ थ्या दिवशीही चालू

नगरपरिषदेने गाळा हटवून त्यातील साहित्य अवैधरित्या कह्यात घेतले, असा आरोप रवि जाधव यांनी केला असून याच्या विरोधात त्यांनी सहकुटुंब उपोषण चालू केले आहे.

कृषी कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार करणारे पवार खरे कि आंदोलनाला पाठिंबा देणारे पवार खरे ? – भाजप

केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आष्टा नगरपालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन 

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची, ४ वर्षांत ३३ टन जंतूनाशक पावडर आणि अन्यत्र झालेल्या अशा २० लाख रुपये व्ययाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी नगरपालिकेच्या समोर शिवसेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहाच्या ६ ठिकाणांवर धाडी

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पैशांच्या देवाण-घेवाण (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अन्वेषण करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने २२ जानेवारी या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार परीसरांत धाडी घातल्या.