पिसाळलेल्या श्वानाच्या आक्रमणात युवक आणि युवती यांचा मृत्यू

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – सातारा शहरापासून जवळच असणार्‍या जकातवाडी आणि डबेवाडी या गावातील पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यामुळे गावातील युवक अन् युवती यांचा मृत्यू झाला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या रूपाली माने आणि देवानंद लोंढे यांचा पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. घायाळ झालेल्या रूपाली माने आणि देवानंद लोंढे यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला आहे. जकातवाडी या गावाजवळच सोनगाव ‘कचरा डेपो’ आहे. यामध्ये संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे लक्षात येत नाही का ? – संपादक)