कृषी कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार करणारे पवार खरे कि आंदोलनाला पाठिंबा देणारे पवार खरे ? – भाजप

केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आष्टा नगरपालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन 

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची, ४ वर्षांत ३३ टन जंतूनाशक पावडर आणि अन्यत्र झालेल्या अशा २० लाख रुपये व्ययाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी नगरपालिकेच्या समोर शिवसेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहाच्या ६ ठिकाणांवर धाडी

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पैशांच्या देवाण-घेवाण (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अन्वेषण करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने २२ जानेवारी या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार परीसरांत धाडी घातल्या.

सीरमला लागलेल्या आगीच्या चौकशीनंतरच अपघात कि घातपात हे स्पष्ट होईल ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे.

मेट्रो कारशेडविषयी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल.

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

चित्रपटात काम मिळवून देतो असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. बलात्काराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते.

पुण्यातील नामांकित रुग्णालयाने जिन्याच्या कोपर्‍यात लावलेल्या देवतांच्या फरशा हटवल्या !

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने जिन्यातील कोपर्‍यात देवतांच्या फरशा (टाईल्स) लावून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली होती.

तिरंग्याचा ‘मास्क’ वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही

‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार ‘राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे वापर करणे’, हा ध्वजाचा अवमानच आहे.

नागपूर येथील केंद्रीय कारागृहात पोलीस शिपाईच अमली पदार्थाचा पुरवठा करत होता !

कारागृहात जाणार्‍या पोलिसांचीच अंगझडती घ्यावी लागते, हे दुदैव होय !

सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘तांडव’ वेब सिरीजचे पोस्टर जाळून व्यक्त केला संताप

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात सोलापूर येथे हिंदु संघटनांच्या वतीने ‘तांडव’ वेब सिरीजचे आणि अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.