सिंधुदुर्गातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शिक्षणाधिकार्यांच्या सूचना

सिंधुदुर्ग – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याविषयी प्रबोधन करण्यासह ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या सूचना पुढीलप्रमाणे …
१. ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी कोरोनाविषयीचे सर्व नियम आणि निर्देश यांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. प्रत्येकाने मास्क लावावा आणि सामाजिक अंतर पाळावे.
२. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा विविध खेळांचे आयोजन करू नये. सामाजिक माध्यमांद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची देशभक्तीपर गाणी आणि भाषणे आयोजित करावीत. ऑनलाईन कार्यक्रम किंवा त्या पद्धतीने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे.
३. ध्वजसंहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी आवश्यक प्रबोधन करावे, तसेच तिरंगी मास्क आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याविषयी प्रबोधन करावे, अशा मार्गदर्शक सूचना या वेळी करण्यात आल्या आहेत.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह