चेंबूर – येथील सिद्धार्थनगर परिसरात चाळीतील घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किट झाल्याने ६ ऑक्टोबरच्या पहाटे आग लागली. पहाटे झोपेत असल्याने यात गुप्ता कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. प्रेम गुप्ता (वय ३० वर्षे), अनिता गुप्ता (वय ३० वर्षे), मंजू गुप्ता (वय ३० वर्षे), परीस गुप्ता (वय ७ वर्षे) आणि नरेंद्र गुप्ता (वय १० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
मुंबई – चेंबूरमधील सिद्धार्थनगर येथील दुर्घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले. येथे झालेल्या दुर्घटनेप्रमाणे पुन्हा दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना काढली जाईल, असे त्यांनी सांगितले.